भजनी मालिका
← भजनांकडे परत

वसती सदा पंढरीसी । नित्य नेमें हरी दरुशनासी । तयां सारखे पुण्यराशी । त्रिभुवनीं दुजे नाहीत

vasati sada pandharisi | nitya nemen hari darushanasi | tayan sarakhe punyarashi | tribhuvanin duje nahit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वसती सदा पंढरीसी । नित्य नेमें हरी दरुशनासी । तयां सारखे पुण्यराशी । त्रिभुवनीं दुजे नाहीत ॥१॥ धन्य क्षेत्र भीवरातीर । पुढे पुंडलीक समोर । तेथें स्नान करती नर । तयां जन्म नाहीं सर्वथा ॥२॥ करती क्षेत्र प्रदक्षिणा । त्याच्यां पार नाहीं पुण्या । जगीं धन्य ते मान्य । एका जनार्दनीं म्हणतसे ॥३॥