भजनी मालिका
← भजनांकडे परत

वर्त्ततां वासर । काय करावें शरीर

varttatan vasar | kay karaven sharir

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वर्त्ततां वासर । काय करावें शरीर ॥१॥ ठेवा नेमून नेमून । माझें तुमचे पायीं मन ॥ध्रु.॥ नेदाविया वृत्ती । कोठें फांकों चि श्रीपती ॥२॥ तुका म्हणे भले । जन्मा येऊनियां ज्याले ॥३॥