भजनी मालिका
← भजनांकडे परत

वर्णितां वेदमती कुंठित पैं जाली । पुराणें भागलीं विवादतां

varnitan vedamati kunthit pain jali | puranen bhagalin vivadatan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वर्णितां वेदमती कुंठित पैं जाली । पुराणें भागलीं विवादतां ॥१॥ सोपारा सुगम पुंडलिकापाठीं । उभा जगजेठी विटेवरी ॥२॥ लक्ष्मी ते स्वयें रुक्मिणी शोभत । विंझणें वारीत सत्यभामा ॥३॥ सांडुनी रत्‍नकिळा गळां तुळसीमाळा । चंदनाचा टिळा केशरयुक्त ॥४॥ गोपाळ गजरें आनंदें नाचती । मध्यें विठ्ठलमूर्ति प्रेमें रंगें ॥५॥ मनाचें मोहन योगाचें निजधन । एका जनार्दनीं चरण विटेवरी ॥६॥