भजनी मालिका
← भजनांकडे परत

वळत्या गाई धांवे घरा । आमच्या करी येरझारा

valatya gai dhanve ghara | amachya kari yerajhara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वळत्या गाई धांवे घरा । आमच्या करी येरझारा ॥१॥ नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥ध्रु.॥ नेदी पडों उणें पुरें । म्हणे अवघें चि बरें ॥२॥ तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥३॥