भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाहवितों पुरीं । आतां उचित तें करीं

vahaviton purin | atan uchit ten karin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाहवितों पुरीं । आतां उचित तें करीं ॥१॥ माझी शक्ती नारायणा । कींव भाकावी करुणा ॥ध्रु.॥ आम्हां ओढी काळ। तुझें क्षीण झालें बळ ॥२॥ तुका म्हणे गोडी । जीवा मातेचिया ओढी ॥३॥