भजनी मालिका
← भजनांकडे परत

वचन ऐका कमळापतीं

vachan aika kamalapatin

वचन ऐका कमळापतीं। मज रंकाची विनंती ।।१।। कर जोडितों कथेकाळीं। आपण असावें जवळी ।।२।। घेई घेई माझी भाक। जरी कां मागेन आणिक ।।३।। तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाची राखावा ।।४।।