भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठोनियां बैसतां घरीं । नाम्या म्हणोनी हांक मारी

uthoniyan baisatan gharin | namya mhanoni hank mari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उठोनियां बैसतां घरीं । नाम्या म्हणोनी हांक मारी ॥१॥ पाहो नेदी कांही धंदा । लावियेलें आपुल्या छंदा ॥२॥ हा तो जन्माचा भिकारी । सदा हिंडे दारोदारीं ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे । आपुल्यासारखें केलें येणें ॥४॥