भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठा भागलेती उजगरा । जाला स्वामी निद्रा करा

utha bhagaleti ujagara | jala svami nidra kara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उठा भागलेती उजगरा । जाला स्वामी निद्रा करा ॥१॥ वाट पाहाते रुक्मिणी । उभी मंचक संवारुणी ॥ध्रु.॥ केली करा क्षमा । बडबड पुरुषोत्तमा ॥२॥ लागतो चरणा । तुकयाबंधु नारायणा ॥३॥