भजनी मालिका
← भजनांकडे परत

उतरला तळीं टाकियेली शय्या । स्नान केलें तया शीतोदकें

utarala talin takiyeli shayya | snan kelen taya shitodaken

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उतरला तळीं टाकियेली शय्या । स्नान केलें तया शीतोदकें ॥१॥ बैसे घालोनियां तृणाचें आसन । सारी नित्य नेम यथाविधी ॥२॥ नेम भंग जाला वर्जिली मोहिनी । नायके तो ध्यानीं बैसला ॥३॥ एका जनार्दनीं अनुतापावांचून । न घडे नामस्मरणं कालत्रयीं ॥४॥