भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपेक्षिला येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आईकिली

upekshila yenen koni sharanagat | aisi nahin mat aikili

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपेक्षिला येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आईकिली ॥१॥ आतां काय ब्रीद सांडील आपुलें । ठायींचें धरिलें जाणोनियां ॥ध्रु.॥ माझ्या दोषासाटीं होईल पाठमोरा । ऐसा कोण पुरा भोग बळी ॥२॥ तुका म्हणे रूप आमुच्या कैवारें । धरिलें गोजिरें चतुर्भुज ॥३॥