भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपासा सेवटीं अन्नासवें भेटी । तैसी माझी मिठी पडो पायीं

upasa sevatin annasaven bheti | taisi majhi mithi pado payin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपासा सेवटीं अन्नासवें भेटी । तैसी माझी मिठी पडो पायीं ॥१॥ पुरवीं वासना साच सर्वजाणा । आम्हां नारायणा अंकिताची ॥ध्रु.॥ बहुदिसां पुत्रामातेमध्यें भेटीं । तैसा दाटो पोटीं प्रीतिउभड ॥२॥ तुका म्हणे धन कृपणा सोईरें । यापरि दुसरें नहो आतां ॥३॥