भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपाधीजें बीज । जळोनि राहिलें सहज

upadhijen bij | jaloni rahilen sahaj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपाधीजें बीज । जळोनि राहिलें सहज ॥१॥ आम्हां राहिली ते आतां । चाली देवाचिया सत्ता ॥ध्रु.॥ पराधीन तें जिणें । केलें सत्ता नारायणें ॥२॥ तुका म्हणे जाणें पाय । खुंटले आणीक उपाय ॥३॥