भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते

upadhichya nanven ghetala sintoda | nedun atan pida atalon te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥१॥ काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु.॥ काय नाहीं देवें करूनि ठेविलें । असें तें आपुलें ते ते ठायीं ॥२॥ तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर बोळविले ॥३॥