भजनी मालिका
← भजनांकडे परत

उंबरांतील कीटका । हें चि ब्रम्हांड ऐसें लेखा

umbarantil kitaka | hen chi bramhand aisen lekha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उंबरांतील कीटका । हें चि ब्रम्हांड ऐसें लेखा ॥१॥ ऐसीं उंबरें किती झाडीं । ऐशीं झाडें किती नवखडीं ॥ध्रु.॥ हें चि ब्रम्हांड आम्हांसी । ऐसीं अगणित अंडें कैसीं ॥२॥ विराटाचे अंगी तैसे । मोजूं जातां अगणित केंश ॥३॥ ऐशा विराटाच्या कोटी । सांटवल्या ज्याच्या पोटीं ॥४॥ तो हा नंदाचा बाळमुकुंद । तान्हा म्हणवी परमानंद ॥५॥ ऐशी अगम्य ईश्वरी लीळा । ब्रह्मानंदीं गम्य तुक्याला ॥६॥