भजनी मालिका
← भजनांकडे परत

उजळितां उजळे दीपकाची वाती । स्वयंभु ते ज्योति हिऱ्या अंगीं

ujalitan ujale dipakachi vati | svayambhu te jyoti hirya angin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उजळितां उजळे दीपकाची वाती । स्वयंभु ते ज्योति हिऱ्या अंगीं ॥१॥ अेकीं महाकष्टें मेळविलें धन । एकासी जतन दैवयोगें ॥ध्रु.॥ परिमळें केलें चंदनाचे चिन्ह । निवडी ते भिन्न गाढव तो ॥२॥ तुका म्हणे जया अंगीं नामठसा । तो तरे सहसा वंद्य होय ॥३॥