भजनी मालिका
← भजनांकडे परत

उगें चि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साठ होती

ugen chi hen man rahaten nishchal | tari kan talamal sath hoti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उगें चि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साठ होती ॥१॥ काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥ नानाछंदें आम्हां नाचवावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥३॥