भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदारा कृपाळा अंगा देवांच्या देवा । तुजसवें पण आतां आमुचा दावा

udara krupala anga devanchya deva | tujasaven pan atan amucha dava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उदारा कृपाळा अंगा देवांच्या देवा । तुजसवें पण आतां आमुचा दावा ॥१॥ कैसा जासी सांग आतां मजपासुनी । केलें वाताहात दिले संसारा पाणी ॥ध्रु.॥ अवघीं आवरूनि तुझे लाविलीं पाठीं । आतां त्या विसर सोहंकोहंच्या गोष्टी ॥२॥ तुका म्हणे आतां चरणीं घातली मिठी । पडिली ते पडो तुह्मा आम्हांसी तुटी ॥३॥