भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदार चक्रवर्ती । वैकुंठीचा भूपति । पुंडलिकाचिया प्रीती । विटेवरी राहिला

udar chakravarti | vaikunthicha bhupati | pundalikachiya priti | vitevari rahila

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उदार चक्रवर्ती । वैकुंठीचा भूपति । पुंडलिकाचिया प्रीती । विटेवरी राहिला ॥१॥ सर्वसिद्धीचा दातार । सवें आणिला परिवार । भक्त अभयंकर । घ्याघ्या ऐसें म्हणतसे ॥ध्रु.॥ जेणें हें विश्व निर्मीलें । महर्षीदेवा संस्थापिलें । एकवीस स्वर्गांतें धरिलें । सत्तामात्रें आपुलिया ॥२॥ तुका म्हणे कृपावंत । इच्छिले पुरवी मनोरथ । रिद्धिसिद्धिमोक्ष देतसे । शेखीं संग आपुला ॥३॥