भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभयतां काकुलती येती । नाम्या नको करुं फजिती

ubhayatan kakulati yeti | namya nako karun phajiti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उभयतां काकुलती येती । नाम्या नको करुं फजिती ॥१॥ आम्हां आलें वृध्दपण । कोण चालवी दुकान ॥२॥ व्यापाराचा नाहीं धाक । सुखें बैसशी तूं देख ॥३॥ अन्नवस्त्र नाहीं घरीं । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥