भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभा पुंडलिकांपुढें । कटीं कर ठेउनी रुपडें

ubha pundalikampudhen | katin kar theuni rupaden

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उभा पुंडलिकांपुढें । कटीं कर ठेउनी रुपडें ॥१॥ पाहतां वेडावलें मन । शिवा लागलेंसे ध्यान ॥२॥ सनकादिक वेडावले । ते पुंडलिके भुलविले ॥३॥ भक्ता देखोनि भुलला । एका जनार्दनीं सांवळां ॥४॥