भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी । पाउलें तरी सम चि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड

ubha dekhila bhimatirin | kar miravale katavari | paulen tari sam chi sajirin | nam tari anant atigod

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी । पाउलें तरी सम चि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड ॥१॥ शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रत्नें । पितांबर उटी शोभे गोरेपणें । लोपलीं तेणें रवितेजें ॥२॥ श्रवणीं कुंडलें देती ढाळ । दशांगुळीं मुद्रिका माळ । दंतओळी हिरे झल्लाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥३॥ कडीं कडदोरा वांकी वेळा । बाहीं बाहुवटे पदक गळां । मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळां विद्युल्लता ॥४॥ सुंदरपणाची साम्यता । काय वर्णु ते पावे आतां । तुकयाबंधु म्हणे रे अच्युता । धन्य ते मातापिता प्रसवली ॥५॥