भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभा भींवरेच्या तिरी राहिलाहे । असे सन्मुख दिक्षणे मूख वाहे । पळे पाप महा सुटे कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामवीर

ubha bhinvarechya tiri rahilahe | ase sanmukh dikshane mukh vahe | pale pap maha sute kamp thor | kaise garjati ghosh he namavir

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उभा भींवरेच्या तिरी राहिलाहे । असे सन्मुख दिक्षणे मूख वाहे । पळे पाप महा सुटे कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामवीर ॥१॥ गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख । मुनिलागे बहु गोड चित्तीं । देहभावना तुटलियासि खंती ॥२॥ ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादाना ते द्यावयासी उदार । सिद्धी वोळगती जया सर्वठायीं । तुझें नाम हें चांगलें गे विठाई ॥३॥ असे उघडा हा विटेवरी उभा । कटसूत्र हें धरुनि भक्तीलोभा । पुढें वाट दावी भवसागराची । विठो माउली सिद्ध हे साधकांची ॥४॥ करा वेग हा तो धरा पंथ आधीं । जया पार नाहीं सुखा तें च साधीं । म्हणे तुका पंढरीस सर्व आलें । असे विश्व हें जीवनें त्याचि ज्यालें ॥५॥