भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं नायकसी कवणाचें । बोलतां नये बहु वाचें । तुझें तुज हिताचें । वर्म आम्हीं सांगूं

tun nayakasi kavanachen | bolatan naye bahu vachen | tujhen tuj hitachen | varma amhin sangun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तूं नायकसी कवणाचें । बोलतां नये बहु वाचें । तुझें तुज हिताचें । वर्म आम्हीं सांगूं ॥१॥ होई सावध झडकरी । नको पडुं आणिके भरीं । वायांची धांवसी दिशाभरी । श्रमूं निर्धारीं तुजची ॥२॥ ब्रह्मज्ञानाची भरोवरी । वाउगी न करी निर्धारी । कर्म अकर्म आधीं सारी । मग निर्धारीं सुख पावे ॥३॥ जेणें तुष्टे जनार्दन । हेंचि करी पां साधन । शरण एका जनार्दन । वाउगा शीण न करी ॥४॥