भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूं चि माझें हित करिता देवा

tun majha mayabap sakal vitta got | tun chi majhen hit karita deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूं चि माझें हित करिता देवा ॥१॥ तूं चि माझा देव तूं चि माझा जीव । तूं चि माझा भाव पांडुरंगा ॥ध्रु.॥ तूं चि माझा आचार तूंचि माझा विचार। तूं चि सर्व भार चालविसी ॥२॥ सर्व भावें मज तूं होसी प्रमाण । ऐसी तुझी आण वाहातसें ॥३॥ तुका म्हणे तुज विकला जीवभाव। कळे तो उपाव करीं आतां ॥४॥