भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं कृपाळू माउली आम्हां दीनांची साउली । न संरित आली बाळवेशें जवळी

tun krupalu mauli amhan dinanchi sauli | na sanrit ali balaveshen javali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तूं कृपाळू माउली आम्हां दीनांची साउली । न संरित आली बाळवेशें जवळी ॥१॥ माझें केलें समाधान रूप गोजिरें सगुण । निवविलें मन आलिंगन देऊनी ॥ध्रु.॥ कृपा केली जना हातीं पायीं ठाव दिला संतीं । कळों नये चित्तीं दुःख कैसें आहे तें ॥२॥ तुका म्हणे मी अन्यायी क्षमा करीं वो माझे आई । आतां पुढें काई तुज घालूं सांकडें ॥३॥