भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं बळिया शिरोमणी । आहेसि माजी ये त्रिभुवनीं । रिघालों पाठी तुझी म्हणउनी । आतां करीन मी असेल तें

tun baliya shiromani | ahesi maji ye tribhuvanin | righalon pathi tujhi mhanauni | atan karin mi asel ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तूं बळिया शिरोमणी । आहेसि माजी ये त्रिभुवनीं । रिघालों पाठी तुझी म्हणउनी । आतां करीन मी असेल तें ॥१॥ कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवाची बंदशाळ । संहारूनि राक्षसदळ । शरणागत राजीं स्थापिला ॥२॥ उपकर्म करावा बहुत । तरी तूं जाणसी धर्मनीत । उचित काय तें अनुचित । राखें शरणागत आलों आतां ॥३॥ तूं देवा प्रतापदिनकर । सुरा असुरांचा सुर । महावीरां वीर धनुर्धन । मी तों पामर काय तेथें ॥४॥ किती म्यां काय विनवावें । शरण आलों जीवें भावें । तुकयाबंधु म्हणे करावें । क्षेम अवघें येणें काळें ॥५॥