भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही उदार सर्वगुणें । मी रंकपणें रंकाहुनी

tumhi udar sarvagunen | mi rankapanen rankahuni

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुम्ही उदार सर्वगुणें । मी रंकपणें रंकाहुनी ॥१॥ काया वाचा आणि मन । केलें समर्पण तव चरणीं ॥२॥ आणिक नाहीं कांहीं चाड । सेवा दृढ संतांची ॥३॥ एका जनार्दनीं तुमचा दास । आहे आस पायांची ॥४॥