भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणूं

tumhi sant mayabap krupavant | kay mi patit kirti vanun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणूं ॥१॥ अवतार तुम्हां धराया कारणें । उद्धरावें जन जड जीव॥ध्रु.॥ वाढविलें सुख भक्ती भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥२॥ तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुम्ही जगीं संतजन ॥३॥