भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें

tumhi sach nupekshal ha bharavasa | maj janatasan adhirasen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें ॥१॥ कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ध्रु.॥ सुटों नये ऐसें कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवुनि ॥२॥ तुका म्हणे तुम्ही सभाग्य जी देवा । माझा तुम्हां केवा काय आला ॥३॥