भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हांसी न कळे सांगा काय एक । कासया संकल्प वागवूं मी

tumhansi na kale sanga kay ek | kasaya sankalpa vagavun mi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्हांसी न कळे सांगा काय एक । कासया संकल्प वागवूं मी ॥१॥ आहे तेथें सत्ता ठेविलें स्थापूनि । प्रमाणें चि वाणी वदे आज्ञा ॥ध्रु.॥ कृपा झाली मग न लगे अंगसंग । निजध्यासें रंग चढता राहे ॥२॥ तुका म्हणे मागें बोलिलों तें वाव । आतां हाचि भाव दृढ झाला ॥३॥