भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हांसी हें अवघें ठावें । किती द्यावें स्मरण

tumhansi hen avaghen thaven | kiti dyaven smaran

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्हांसी हें अवघें ठावें । किती द्यावें स्मरण ॥१॥ कां बा तुम्ही ऐसें नेणें । निष्ठुर पणें टाळितसां ॥ध्रु.॥ आळवितां मायबापा । नये कृपा अझूनि ॥२॥ तुका म्हणे जगदीशा । काय असां निजले ॥३॥