भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हांसाटीं आम्हां आपुला विसर । करितां अव्हेर कैसें दिसे

tumhansatin amhan apula visar | karitan avher kaisen dise

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्हांसाटीं आम्हां आपुला विसर । करितां अव्हेर कैसें दिसे ॥१॥ विचारा जी आतां ठायीचें हे देवा । आम्हां नये हेवा वाढवितां ॥ध्रु.॥ आलों टाकोनियां सुखाची वसती । पुढें माझ्या युक्ती खुंटलिया ॥२॥ तुका म्हणे जाला सकळ वृत्तांत । केला प्रणिपात म्हणऊनि ॥३॥