भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमच्या चरणींक मिठी । आतां तुटी न करावी

tumachya charanink mithi | atan tuti na karavi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुमच्या चरणींक मिठी । आतां तुटी न करावी ॥१॥ थोराचे जें थोरपण । तुम्हां करणें सहजची ॥२॥ मी पतीत दीन हीन । म्हणोनि शरण तुम्हांसी ॥३॥ पतीत पावन तुम्ही संत । एवढें आर्त पुरवा ॥४॥ एका जनार्दनीं शरण । त्याचे चुकवा जन्ममरण ॥५॥