भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचें तुम्हां सांगतों साचें । मनें वाचे रामनाम

tumachen tumhan sangaton sachen | manen vache ramanam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुमचें तुम्हां सांगतों साचें । मनें वाचे रामनाम ॥१॥ तेणें उतराल पैलथडी । चुकेल बेडी चौर्‍याशींची ॥२॥ प्रपंचाचें भोवर जाळें । यांत सगळे अटकाल ॥३॥ काया वाचा आणि मनें । एका जनार्दनीं आठवावा ॥४॥