भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुळशी काष्ठाची माळ । गळां घालावी निर्मळ

tulashi kashthachi mal | galan ghalavi nirmal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुळशी काष्ठाची माळ । गळां घालावी निर्मळ ॥१॥ होतां एकचि स्नान । सर्व तीर्थांचे मार्जन ॥२॥ नित्य वंदितां तुळशी । काळ पळे देशोदेशीं ॥३॥ तुळशीचें पाणी । वसे त्रैलोक्यचरणीं ॥४॥ एका जनार्दनीं ध्याऊं । नित्य पाहूं तुळशीसी ॥५॥