भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें तुझ्या ठायीं । तुजचि शुद्धि नाहीं । मी मी म्हणती काई । न कळे तुज

tujhen tujhya thayin | tujachi shuddhi nahin | mi mi mhanati kai | na kale tuj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुझें तुझ्या ठायीं । तुजचि शुद्धि नाहीं । मी मी म्हणती काई । न कळे तुज ॥१॥ मीपण ठेवितां ठायीं । तुंचि ब्रह्मा पाहीं । इतर साधन कांहीं । नलगे येथें ॥२॥ मीपण तत्त्वतां । साच जेथें अहंता । एका जनार्दनीं तेचि ते निजात्मता ॥३॥