भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजसवें आम्हीं अनुसरलों अबळा

tujasaven amhin anusaralon abala

तुजसवें आम्हीं अनुसरलों अबळा । नको अंगीं कळा राहों हरी हीन देऊं ॥१॥ सासुरवासा भीतों जीव ओढे तुजिपाशीं । आतां दोहींविशी लज्जा राखे आमुची ॥ध्रु.॥ न कळतां संग झाला सहज खेळतां । प्रवर्तली चिंता मागिलांचियावरी ॥२॥ तुका म्हणे असतां जसै तसै बरवे । वचन या भावे वेचूनियां विनटलों ॥३॥