भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज नाहीं शक्ती । काम घेसी आम्हां हातीं

tuj nahin shakti | kam ghesi amhan hatin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज नाहीं शक्ती । काम घेसी आम्हां हातीं ॥१॥ ऐसें अनुभवें पाहीं । उरलें बोलिजेसें नाहीं ॥ध्रु.॥ लपोनियां आड । आम्हां तुझा कैवाड ॥२॥ तुका म्हणे तुजसाठी । आम्हां संवसारें तुटी ॥३॥