भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज न करितां काय नव्हे एक । हे तों सकिळक संतवाणी

tuj na karitan kay navhe ek | he ton sakilak santavani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज न करितां काय नव्हे एक । हे तों सकिळक संतवाणी ॥१॥ घेई माझा भार करीं कइवार । उतरीं हा पार भवसिंधु ॥ध्रु.॥ उचित अनुचित पापपुण्यकाला । हा तों नये मला निवडितां ॥२॥ कुंटित राहिली बोलतां बोलतां । पार न पवतां वाणी पुढें ॥३॥ पुसतां ही कोणां न कळे हें गुज । राखें आतां लाज पांडुरंगा ॥४॥ तुका म्हणे बहु पाहिलें या जीवें । वर्म जालें जी ठावें नाम तुझें ॥५॥