भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज मज नाहीं भेद । केला सहज विनोद

tuj maj nahin bhed | kela sahaj vinod

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज मज नाहीं भेद । केला सहज विनोद ॥१॥ तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥ध्रु.॥ मी तुजमाजी देवा । घेसी माझ्या अंगें सेवा ॥२॥ मी तुजमाजी अचळ । मजमाजी तुझें बळ॥३॥ तूं बोलसी माझ्या मुखें । मी तों तुजमाजी सुखें ॥४॥ तुका म्हणे देवा । विपरीत ठायीं नांवा ॥५॥