भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज काय करूं मज एक सार । अमृतसागर नाम तुझें

tuj kay karun maj ek sar | amrutasagar nam tujhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज काय करूं मज एक सार । अमृतसागर नाम तुझें ॥१॥ काय येणें उणें आम्हां तयापोटीं । गोवितां हे कंठीं कामधेनु ॥ध्रु.॥ नोळखे तानुलें माय ऐसी कोण । वोरसे देखून शोक त्याचा ॥२॥ जो नाहीं देखिला याचक नयनीं । तो पावे घेउनि लज्जा दान ॥३॥ नामासाठी प्राण सांडियेला रणीं । शूर ते भांडणीं न फिरती ॥४॥ तुका म्हणे आम्ही गातां गीतीं भला । भेटूनी विठ्ठला काय चाड ॥५॥