भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव वाचाकायामन

tuj dilen atan karin yatna yacha | jivabhav vachakayaman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव वाचाकायामन ॥१॥ भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥ नेणतां सोसिली तयाची आटणी । नव्हतां ही कोणी कांहीं माझीं ॥२॥ वर्म नेणें दिशा हिंडती मोकाट । इंद्रियें सुनाट दाही दिशा ॥३॥ वेरझारीफेरा सिणलों सायासीं । आतां हृषीकेशी अंगिकारीं ॥४॥ तुका म्हणे मन इंद्रियांचे सोई । धांवे यासी काई करूं आतां ॥५॥