भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिविधपातें तापलें भारी । तया पंढरी विश्रांती

trividhapaten tapalen bhari | taya pandhari vishranti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रिविधपातें तापलें भारी । तया पंढरी विश्रांती ॥१॥ आणिके सुख नाही कोठें । पाहतां नेटें कोटि जन्म ॥२॥ कालाचेहि न चले बळ । भुमंडळ पंडरीये ॥३॥ भुवैकुंठ पंढरी देखा । ऐसा लेखा वेदशास्त्री ॥४॥ एका जनार्दनी धरुनि कास । पंढरीचा दास वारकरी ॥५॥