भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविले

trividhakarmache vegalale bhav | nivaduni thav dakhavile

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविले॥१॥ आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख तो गौरव संतां अंगीं ॥ध्रु.॥ हिशेबें आलें तें सकळांसी प्रमाण । तेथें नाही आन चालों येत ॥२॥ तुका म्हणे नाहीं पापपुण्य खतीं । झाड्याची हुजती हातां आली ॥३॥