भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिवर्ग भोजना बैसले ते जाणा । गोणाई नाम्याकारण बोलतसे

trivarga bhojana baisale te jana | gonai namyakaran bolatase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रिवर्ग भोजना बैसले ते जाणा । गोणाई नाम्याकारण बोलतसे ॥१॥ नाम्या किती शिकवितां नायकसी बाळा । विठ्ठलाचा चाळा नको नाम्या ॥२॥ घेऊनि कापड जाईं बाजारासी । तेणें वडिलांसी समाधान ॥३॥ नामदेव म्हणे उदईक जाईन । एका जनार्दनीं आण वाहातसे ॥४॥