भजनी मालिका
← भजनांकडे परत

तिसरे अवतारीं नामा उध्दव जन्मला । करुनी कृष्ण दास्यत्व मान्य पैं जाहला

tisare avatarin nama udhdav janmala | karuni krushna dasyatva manya pain jahala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तिसरे अवतारीं नामा उध्दव जन्मला । करुनी कृष्ण दास्यत्व मान्य पैं जाहला ॥१॥ ज्ञान वैराग्य भक्ति कृष्ण सांगे तयासी । तेणें चुकविलें शापबंधासी ॥२॥ भागवत मथितार्थ स्वयें सांगे आपण । कृष्णावेगळा न जाय अर्धक्षण ॥३॥ यापरी दास्यत्व तेथें निकट केलें । एका जनार्दनीं म्हणे वंदूं त्यांचीं पाउलें ॥४॥