भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान

tirthatanen eken tapen humbarati | nathile dhariti abhiman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥१॥ तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु.॥ अक्षरें आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावें ॥२॥ तुका म्हणे विधिनिषधाचे डोहीं । पडिले त्यां नाहीं देव कधीं ॥३॥