भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीर्थांचे जे मूळ व्रतांचें फळ । ब्रम्ह तें केवळ पंढरिये

tirthanche je mul vratanchen phal | bramha ten keval pandhariye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तीर्थांचे जे मूळ व्रतांचें फळ । ब्रम्ह तें केवळ पंढरिये ॥१॥ तें आह्मीं देखिलें आपुल्या नयनीं । फिटलीं पारणीं डोळियांचीं ॥ध्रु.॥ जीवांचें जीवन सुखाचें शेजार । उभें कटीं कर ठेवूनियां ॥२॥ जगाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभापार दुष्टां काळ ॥३॥ सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तोचि असे ॥४॥ तुका म्हणे नाहीं श्रुती आतुडलें । आम्हां सांपडलें गीती गातां ॥५॥