भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीर्थाचिये आसे । पंथ तो निदैव । पाविजेतो ठाव अंतराय

tirthachiye ase | panth to nidaiv | pavijeto thav antaray

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तीर्थाचिये आसे । पंथ तो निदैव । पाविजेतो ठाव अंतराय ॥१॥ म्हणऊनि भलें निश्चळ चि स्थळीं । मनाचिये मुळीं बैसोनियां ॥ध्रु.॥ संकल्पारूढ तें पराधीन जिणें । कार्य चि कारणें वाढतसे ॥२॥ तुका म्हणे कामा नाहीं एक मुख । जिरवितां सुख होतें पोटीं ॥३॥