भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसाऐसे

tirtha jal dekhe pashan pratima | sant te adhama manasaaise

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसाऐसे ॥१॥ वांजेच्या मैथुनापरी गेलें वांयां । बांडेल्याचें जायां जालें पीक ॥ध्रु.॥ अभाविक सदा सुतकी चांडाळ । सदा तळमळ चुके चि ना ॥२॥ तुका म्हणे वरदळी ज्याची दृष्टी । देहबुद्धि कष्टी सदा दुःखी ॥३॥